मोदींना समजते ते राज्यातील भाजपला नेत्यांना समजत नाही का? - संजय राऊत

मोदींना समजते ते राज्यातील भाजपला नेत्यांना समजत नाही का? - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंजाबमधील परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरांमधून भाजपवर टीकेचा बाण सोडताना मोदींचं कौतुक केलं आहे. तर अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. विरोधकांची सरकारे पाडणे, त्यांना काम करण्यापासून रोखणे ही लोकशाही नाही हे आपल्या पंतप्रधानांना जेवढे समजते तेवढे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना का समजू नये? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंजाब जिंकण्यासाठी अकार्यक्षम अमरिंदर हवे आहेत. पंजाब, दिल्ली, गुजरातेत उलथापालथी झाल्या. त्यातून नवे काय घडणार? असाही प्रश्न उपस्थित केलाय. तर अमित शहा यांच्याच कारकिर्दीत शिवसेना-भाजपची युती तुटल्याचेही सांगितलं.

मोदींना समजते ते राज्यातील भाजप नेत्यांना समजत नाही का?

मुख्यमंत्री ठाकरेंपेक्षा राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सगळय़ात जास्त दिल्ली वाऱया करतात. भाजपचे नेते दिल्लीत जातात व मोदी-शहांना भेटतात. अशा भेटीतून राज्यात सत्ता परिवर्तन होणार नाही. त्यातले काहीजण सीबीआय किंवा ईडी कार्यालयाची पायधूळ झाडतात. घटनाविरोधी पद्धतीने काम करून ठाकरे सरकार घालवता येणे शक्य नाही. श्री. मोदी हे अमेरिकेत जाऊन स्वदेशातील लोकशाहीचे गोडवे गाऊन आले आहेत. त्यामुळे विरोधकांची सरकारे पाडणे, त्यांना काम करण्यापासून रोखणे ही लोकशाही नाही हे आपल्या पंतप्रधानांना जेवढे समजते तेवढे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना का समजू नये?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच हायकमांड-

उद्धव ठाकरे दिल्लीत गेले. तिथे ते अमित शहा यांना बंद दाराआड भेटतील. त्या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल, असे ढोल इलेक्ट्रॉनिक मीडियाने वाजवले. ते आता थंड पडले. मुख्यमंत्री त्याच दिवशी दुपारी मुंबईत परतले व मीडियाच्या मनात होते तसे काहीच घडले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच हायकमांड आहेत व त्यांना वारंवार दिल्लीत जायची गरज नसते. केंद्र सरकारशी संबंधित बैठकांना हजेरी लावणे यात राजकारण शोधणे हास्यास्पद आहे. श्री. अमित शहा यांच्याच कारकिर्दीत शिवसेना-भाजपची युती 2014 साली तुटली. दुसऱयांदा ती 2019 साली तुटली व राज्यात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले सरकार आहे हे एवढेच विरोधी पक्षाने लक्षात ठेवले पाहिजे.

सिद्धू हा अशांत, अतृप्त आत्मा

पंजाब मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱयांना मंत्री केले. पंजाबातील बहुसंख्य आमदार हे कॅ. अमरिंदर यांच्या विरोधात गेले व कॅ. अमरिंदर अहंकार व मौजमस्तीत आकंठ बुडून राहिले. आता त्याच अहंकारी अमरिंदर यांची बाजू घेऊन भाजपवाले उभे राहिले आहेत. हे मूर्खाचे आठवे लक्षण आहे. राजकारण किती बेभरवशाचे असते, हे पंजाबातल्या घडामोडींवरून दिसते. कॅ. अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी ज्यांनी मोहीम राबवली ते नवज्योतसिंग सिद्धूच जास्त बेभरवशाचे निघाले. अमरिंदर यांना हटवूनही त्यांचे मन शांत झाले नाही. पंजाबातील मंत्रिमंडळात त्यांच्या मनाप्रमाणे प्यादी बसवता आली नाहीत, तेव्हा सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाच राजीनामा दिला. सिद्धू हे कॉमेडियन आहेत हे त्यांनी स्वतःच दाखवून दिले. सिद्धू हा अशांत, अतृप्त आत्मा आहे. देशाचे राष्ट्रपतीपद दिले तरी ते अशांत व असंतुष्टच राहतील, अशा लोकांनी राजकारणात येऊन जास्त घाण करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com