'गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं हेरॉइन सापडल्यावर गप्प का?'

sanjay raut
sanjay rautsakal media

नवी दिल्ली : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलोग्रॅम वजनाचे हेरॉइन (Gujrat heroine case) जप्त करण्यात आले. याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena mp sanjay raut) यांनी भाजप सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

sanjay raut
गुजरातचे जप्त करण्यात आलेले हेरॉइन २१ हजार कोटींचे

आमच्या मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ ग्रॅम हेरॉइन सापडलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या प्रकरणामध्ये हे उघडकीस आलं होतं. तेव्हा सर्वांनी भंडावून सोडलं होतं. आता गुजरातमध्ये ३ हजार किलो हेरॉइन सापडलं, तर कोणीच बोलत नाही. २१ हजार कोटींचा साठा पकडला तरी तोंडात बोळा कोंबून का बसलेत? राज्यातील भाजपचे नेते यावर का बोलत नाहीत? दोन ग्रॅम हेरॉइनवर नंगा नाच केला होता. आता ९ हजार कोटींचे हेरॉइन सापडलं तर गप्प का बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

गुजरातमध्ये सापडलेले हेरॉइन हे कुठं जातं होतं? याचा तपास करायला पाहिजे. यावरून कोण पैसे कमावत होते हे तपासणे देखील महत्वाचे आहे. गुजरात हेरॉईनचे थेट अफगाणिस्तानसोबत कनेक्शन आहे. तालिबानसोबत संबंध आहेत. तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन सापडले, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना केला आहे.

दरम्यान, गुजरात हेरॉइन प्रकरणी ड्रग्जचे रॅकेट चालविणाऱ्या एका दाम्पत्याला चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. हे अंमली पदार्थ अफगाणिस्तानातून येथे आणण्यात आल्याचे कळल्यानंतर ‘डीआरआय’ने कारवाईचा बडगा उगारला होता. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नोंदणी असलेल्या एका कंपनीने हे अमली पदार्थ मागविले होते. अर्धवट प्रक्रिया झालेले हे पावडरचे टणक गोटे आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ते गुजरातेतील मुंद्रा बंदरात आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी या भागांत छापे घालण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून याप्रकरणी कारवाई सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com