Sanjay Raut Answers Notice: अखेर हक्कभंगाच्या नोटिशीला राऊतांनी उत्तर दिलंच; उत्तरात म्हणाले,...

विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal

Mumbai News: खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशीला राऊतांनी अखेर उत्तर दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असा दावा संजय राऊत केला आहे.

संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केलं होतं. या विधानानंतर मोठा गदारोळ माजला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय चांगलाच लावून धरण्यात आला होता. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती.

Sanjay Raut
Women's Day 2023 : 'विधवा' ऐवजी 'पूर्णांगिनी' म्हणा; महिला आयोगाकडून राज्य सरकारकडे शिफारस

मात्र दिलेल्या वेळेत राऊतांनी नोटिशीला उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे आता हा विषय केंद्राकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच त्यांना स्मरणपत्र पाठवण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र आता अखेर संजय राऊतांनी हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut
Budget Session 2023 : अहिरेंपाठोपाठ भाजपा आमदार नमिता मुंदडाही २ महिन्यांच्या बाळासह कर्तव्यासाठी दाखल

आपल्या उत्तरात संजय राऊत म्हणतात,"मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं. विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तपासून पाहावं."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com