esakal | '100 दाऊद, एक राऊत' अजूनही हीच मर्दाची ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

'100 दाऊद, एक राऊत' अजूनही हीच मर्दाची ओळख

संजय राऊत यांची ही ओळख त्यांची टॅगलाईन ओळखली जाऊ लागली. मुंबईत गँगवार मोठ्या प्रमाणात होता. त्यावेळी गुंड रमा नाईकचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर झाला अस बोलले गेले. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली होती.

'100 दाऊद, एक राऊत' अजूनही हीच मर्दाची ओळख

sakal_logo
By
सागर आव्हाड

सध्या सोशल मीडियावर एक नाव गाजत आहे, ते म्हणजे एक गुंडा पत्रकार आणि राज्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भूमिका परखड व ठामपणे मांडणारा नेता म्हणजे संजय राऊत. भाजपला व केंद्रीय नेतृत्वही सेनाला जी वागणूक देत होत तिला उत्तर देण्याचा काम राऊत यांनी केलं आणि भाजपला दूर ठेण्यात राऊत यशस्वी झाले.100 दाऊद एक राऊत ही त्यांची ओळख त्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांची ही ओळख त्यांची टॅगलाईन ओळखली जाऊ लागली. मुंबईत गँगवार मोठ्या प्रमाणात होता. त्यावेळी गुंड रमा नाईकचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. दाऊदच्या टिपवरून हा एन्काऊंटर झाला अस बोलले गेले. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात या एन्काऊंटरमुळे खळबळ उडाली होती. कुठली माहिती ही त्यावेळी उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये कोणीही छापत नव्हतं, मात्र संजय राऊत हे क्राईम रिपोर्टर म्हणूण लोकप्रभामध्ये काम करत होते. ज्या ठिकाणी चकमक झाली तिथं ते गेले. त्यांनी रमा नाईकवर कवर स्टोरी केली ती छापण्यात आली. त्यावेळी 100 दाऊद तर एक संजय राऊत अशी ओळख निर्माण झाली.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

राऊत खमके आहेत हे सांगण्यासाठी हीच लाईन योग्य आहे आणि हीच ती वेळ असं पुन्हा सिद्ध करत भाजपला दूर लोटल महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणार ही नाही हे राऊत यांनी सिद्ध केले आहे. दिल्लीत शरद पवारांच्या नंतर मराठी नेतृत्व आता राऊत असू शकतात. कारण सर्व पक्षांबरोबर त्यांचे संबंध आहेत .संजय राऊत यांचं बालपण माहिममध्ये गेले. त्यांचे वडील राजाराम राऊत कंपनीत कामगार होते. मात्र क्राईम व राजकीय रिपोर्टिंग पाहून 29 व्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सामनाचे कार्यकारी संपादक केले. आता शिवसेनेच्या या विश्वासावर राऊत खरे उतरताना दिसत आहेत.