esakal | एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले आणि हे दुसरे... : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

आम्ही 162 हे कालचे दृश्य सत्यमेव जयतेचे उदाहरण आहे. आमच्याकडे 162 आमदार आहेत. भाजपकडून तिन्ही पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाच्या जोरावर भाजप हा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सध्या अनेक खोटारडे फिरत आहेत. राज्यपालांना खोटी चिठ्ठी दाखवून शपथ घेतली. महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटणार नाही.

एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले आणि हे दुसरे... : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बहुमताची हत्या करून, ज्यांच्याकडे बहुमत नाही अशांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. बहुमताचा अपमान करून चांडाळ-चौकडीला संधी दिली आहे. एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तर दुसऱ्याने लोकशाहीलाच फाशी दिली, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी आज (मंगळवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोमवारी रात्री मुंबईत विरोधी पक्षांनी एकजूट असल्याचे दाखवत आम्ही 162 दाखवून दिले होते. त्यांनी आज भाजपसह, अजित पवार व राज्यपालांवरही टीका केली.

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क

संजय राऊत म्हणाले की आम्ही 162 हे कालचे दृश्य सत्यमेव जयतेचे उदाहरण आहे. आमच्याकडे 162 आमदार आहेत. भाजपकडून तिन्ही पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पैशाच्या जोरावर भाजप हा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सध्या अनेक खोटारडे फिरत आहेत. राज्यपालांना खोटी चिठ्ठी दाखवून शपथ घेतली. महाविकासआघाडीचा एकही आमदार फुटणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करू नका. बहुमत चाचणीवेळी आमचा आकडा आता 162 असली तरी तिथे ती 170 होईल. बहुमताचे बनावट पत्र दाखवून सत्तेत आले आहेत. संविधान संरक्षण असणाऱ्या राज्यपालांनीच संविधानाची हत्या केली. लोकशाहीची तिरडी उचलणाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अजित पवार हे जागतिक कार्य केले आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलणार. आदल्यादिवसापर्यंत आमच्याशी चर्चा करत होते. अचानक दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे ते महान विचाराचे नेते आहेत.

भाजपला मोठा झटका; जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते