esakal | वो लोग कमाल करते है : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. सातत्याने भाजपवर हल्ला करणाऱ्या राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे लोक काहीच करत नाहीत, ते खरंच कमाल करतात. राऊत यांनी नक्की काय म्हणायचे आहे, यावरून तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

वो लोग कमाल करते है : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असताना आज (बुधवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है, असे सूचक विधान केले आहे.

मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीपदे तुम्ही घ्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे सांगून संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपची नव्याने कोंडी केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेची बाजू मांडली. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. सातत्याने भाजपवर हल्ला करणाऱ्या राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे लोक काहीच करत नाहीत, ते खरंच कमाल करतात. राऊत यांनी नक्की काय म्हणायचे आहे, यावरून तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 13 मंत्रीपदांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. हा प्रश्न राऊत यांना विचारला असता त्यांनी भाजपने सगळी मंत्रीपदे घ्यावीत, पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मुद्दा हा खात्यांचा नसून मुख्यमंत्रिपदाचा आहे. शिवसेनेला मलईदार खाती पाहिजेत, असे बोलले जाते, पण आम्ही बाळासाहेबांनी उभी केलेली मध्यमवर्गीय माणसे आहोत. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते रस्त्यावरच काम करणार, असेही राऊत म्हणाले. गेल्या पाच वर्षांत सुडाचे राजकारण केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली होती.

loading image
go to top