Shivsena Podcast : सडलेली पाने झडलीत, आता नवीन महाराष्ट्र उभा राहतोय; ठाकरेंचं सद्यस्थितीवर भाष्य

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

Mumbai News - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बहुचर्चित आवाज कुणाचा पॉडकास्ट आज प्रसिद्ध झाले. या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर आणि राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. मागील दोन दिवसांपासून या पॉडकास्टची चर्चा होती.

Uddhav Thackeray
Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज रेड अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आवाज कुणाचा असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की, ज्यांनी या घडामोडी घडवल्या, त्यांचा घडा भरत आला आहे. सडलेली पाने ही पडलीच पाहिजे. ती पाने पडल्यानंतर नवीन अंकूर फुटतात. वृक्ष पुन्हा ताजातवाणा होतो. सडलेली पाने झडलेली आहेत आणि नवीन कोंम फुटलेले आहेत.

काही वेळा फसगत होते. आपण ज्यांना आपलं समजतो ते बांडगुळं निघतात. तरी देखील आपल्यासोबत आहे, असं वाटत राहतं. प्रत्येक्षात ती मुळ वृक्षाचा रस खेचत असते. वृक्ष असूनही बहरलेला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. अर्थात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत बंड करून गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackrey News : 'शिवसेनेने खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं? ती का फोडली?', ठाकरेंचा सवाल

धनुष्यबाण की मशाला यापेक्षा शिवसेना हे नाव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोगाचं काम निवडणूक चिन्ह देण्याचं असून पक्षाचं नाव बदलण्याचं किंवा नाव देण्याच नाही. आपण याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आपण ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती, त्याची पूर्तता केल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.