SC Decision on Shiv Sena: सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...; वाचा तज्ञ काय म्हणतात

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण
Shivsena
Shivsenaesakal

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

Shivsena
Lok Sabha 2024: लोकसभेसाठी भाजपचा फुलप्रूफ प्लॅन, 'हे' मित्रपक्ष मिळवून देतील 60 जागा; जाणून घ्या फॉर्मूला

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल ९ महिने सुनावणी सुरू होती. दरम्यान कोर्टाच्या निकालावर देशाचं लक्ष लागून आहे. मात्र या निकालावर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही की निकाल कसा लागेल.

हेही वाचा- सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court

Shivsena
Pune Crime: सुसंस्कृत पुण्यात हुंडाबळी! २१ वर्षीय महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी 'सकाळ'शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.

सुप्रिम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यात आहे. निकाल ठाकरेंच्या विरोधात गेल्यावर काय होईल या प्रश्नाचं उत्तर देताना बापट म्हणाले, ठाकरे गटासमोर दोन बाबी असू शकतात.

एक म्हणजे ठाकरे गटाला निकाला विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून दाद मागता येऊ शकते, आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगात जाऊन नवीन पक्षाचं नाव, नवीन चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरो जाणे येवढाच मार्ग ठाकरे गटा समोर असू शकतो. अशी माहिती कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.

हेही वाच-सत्तसंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या खासदारांचं काय होणार? वाचा तज्ञ काय म्हणतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com