सुभाष देसाईंना मंत्रिपद मिळालं याचं वाईट वाटलं, कदमांनी व्यक्त केली नाराजी|Ramdas Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

सुभाष देसाईंना मंत्रिपद मिळालं याचं वाईट वाटलं - रामदास कदम

मुंबई : रामदास कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) शिवसेना सोडणार अशा चर्चा रंगल्या आहे. ते आधीपासूनच नाराज होते, असंही बोललं जात होतं. मात्र, आज स्वतः रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुभाष देसाईंना मंत्रिपद (Minister Subhash Desai) मिळालं त्याचं वाईट वाटल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: रामदास कदम शिवसेना सोडणार? पत्रकार परिषदेत फोडणार बॉम्ब

खरा पक्षप्रमुख कोण? -

अख्ख आयुष्य शिवसेनेसाठी खर्ची घातलं. जेव्हा पक्षावर वेळ होती तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या गाडीत समोर बसायचो. आज आमच्यावर अशी वेळ आलीये. आम्हाला अशी वागणूक दिली जाते. आता आम्हाला प्रश्न पडलाय पक्षप्रमुख अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे आहेत? असं रामदास कदम म्हणाले.

सुभाष देसाईंना मंत्रिपद कसं दिलं? -

''मी मातोश्रीवर गेलो नाही, मंत्रालयात गेलो नाही हे मी कबूल करतो. मी कुठलीही निवडणूक लढणार नाही, असं जाहीर केलं होतं. पण, असं असताना देखील रामदास कदमांचा पत्ता कट, अशा बातम्या मला दिसल्या. त्यामुळे मला दुःख झालं. आम्हाला मंत्रिपदं देऊ नका, नवीन लोकांना मंत्रिपद द्या, असं मी स्वतः उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. पण, ज्यावेळी मंत्रिपदांची यादी आली त्यावेळी सुभाष देसाईंचं नाव दिसलं त्याचं वाईट वाटलं. मला मंत्रिपद मिळालं नाही आणि सुभाष देसाईंना मंत्रिपद कसं दिलं? पण, मला आता कुठलंही पद नको आहे. मला ३२ वर्ष आमदारकी मिळाली हे कमी आहे का? असं रामदास कदम म्हणाले.

शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात जाऊ नये -

अनिल परबांसारखे लोक येऊन जाहीर घोषणा करतात, की याची हकालपट्टी करा. अनिल परब तुमच्या बापाचा पैसा आहे का? मी तुमच्याविरोधात न्यायालयात जाईन. उद्धवजींनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं. आज उद्धवजी विधानभवनात आले ते मला कळलं. त्यांच्या आजारपणामुळे मधल्या लोकांनी फायदा घेतला. पण, उद्धव ठाकरे शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही, असा मला विश्वास आहे, असंही रामदास कदम म्हणाले.

Web Title: Shivsena Ramdas Kadam Disappoint Due To Not Getting Ministery In Mahavikas Aghadi Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ramdas Kadam