ShivSena Row: शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाहीत; अ‍ॅड. श्रीहरी अणेंची माहिती

शिवसेनेच्या पक्षनिधीवर एकनाथ शिंदे दावा करु शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray

नागपूर : शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या आमदारांना व्हिप पाळण्याबाबत इशाराही देण्यात आला आहे. पण दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाहीत, असं ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी म्हटलं आहे. (ShivSena Row Both factions cannot whip each other Info by Adv Srihari Ane)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
ShivSena Row: शिवसेनाप्रमुख कोण? शिवसेना भवन कोणाचं?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गट पक्षनिधीवर दावा करु शकतो

अणे म्हणाले, "शिवसेना पक्षाची आता घोषणा झालेली आहे. शिंदे गट हाच शिवसेना पक्ष असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्यामुळं पक्षाच्या निधीवर शिंदे गटाचा दावा राहिलं. पण जर २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गट हारला आणि ठाकरे गट जिंकला. त्यानंतर ठाकरेंनी जर दावा केला की आम्हीच शिवसेना आहोत तर ते पुन्हा या निधीवर दावा करु शकतील"

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
ShivSena Row: "हे आधीच ठरलं होतं त्यानंतर शिवसेना फुटली"; संजय राऊतांचा मोठा दावा

पण जसं भाजपचा व्हिप सेनेवर चालत नाही किंवा सेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही तसेच यो दोन्हींचे व्हिप इतर कोणावर चालत नाही. कायद्यामध्ये हे दोन भिन्न गट आहेत. त्यामुळं जर कोणाचा कोणावर कन्ट्रोल असेल तर त्या व्हिपला अर्थ आहे. पण दोघांचा एकमेकांशी संबंध नसेल तर त्यांचा व्हिप लावण्याचा उद्देशच नाही, असंही अॅड. अणे यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com