Shivsena Row : मोठी बातमी! चिन्ह व नाव शिंदेंना मिळाल्यावर ठाकरेंचं पुढचं पाऊल ठरलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Shivsena Row : मोठी बातमी! चिन्ह व नाव शिंदेंना मिळाल्यावर ठाकरेंचं पुढचं पाऊल ठरलं

Shivsena Row : मोठी बातमी! चिन्ह व नाव शिंदेंना मिळाल्यावर ठाकरेंचं पुढचं पाऊल ठरलं

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे पुढे काय करणार? हा प्रश्न सगळ्या राज्याला पडला आहे. अशातच आता ठाकरेंचं पुढचं पाऊल ठरलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आजच एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची कायदेविषयक अभ्यासक, ज्येष्ठ विधीज्ञ यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा झाली. यावेळी घटनातज्ज्ञ उल्हास बापट, काही वकील आणि शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर चर्चा झाली.

या चर्चेअंती निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं ठरवलं आहे. तसंच आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्टे देण्यासाठी उध्दव ठाकरे गट याचिका दाखल करणार असल्याची माहिती 'साम'च्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.