Sun, March 26, 2023

Sandeep Deshpande : कोण ते, कुठे असतात? देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sandeep Deshpande : कोण ते, कुठे असतात? देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
Published on : 3 March 2023, 6:48 am
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खासदार संजय राऊत यांचं नाव घेत मनसे नेत्यांनी या हल्ल्याप्रकरणी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, राऊतांनी यावरुन प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांना देशपांडेंवरील हल्ल्याबद्दल विचारलं असता, ते म्हणाले, "कोण ते? कुठे असतात? मला माहित नाही. सर्वसामान्य जनता असो किंवा राजकीय कार्यकर्ता कोणावरही हल्ला करणं चुकीचंच आहे. या हल्ल्याचा मी निषेधच करतो. असे हल्ले होणं हे चांगल्या कायदा सुव्यवस्थेचं लक्षण नाही. असा कोणावरही हल्ला करणं चुकीचं आहे."