Exit Poll: 'एक्झिट पोलवर अजिबात विश्वास नाही'; महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये किती जागा मिळतील? ठाकरे गटाचा काय आहे अंदाज?

Exit Poll 2024 Prediction: ४ जून रोजी खरा निकाल समोर येईल, पण त्याआधी एक्झिट पोलवरुन मतदारांचा कल समजून घेता येतो.
uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई- १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल समोर आणले आहेत. ४ जून रोजी खरा निकाल समोर येईल, पण त्याआधी एक्झिट पोलवरुन मतदारांचा कल समजून घेता येतो. एक्झिट पोलमध्ये एनडीए जवळपास ३५० जागा मिळवत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मत दिलेलं नाही. कालच्या एक्झिट पोलमध्ये ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये २६ जागा आहेत. एक्झिट पोल कंपनीने त्याठिकाणी भाजपला ३३ जागा दाखवल्या. मला वाटलं होतं हे सर्व मिळून भाजपला ८०० ते ९०० जागा देतील. मोदी ध्यानाला बसले होते, कॅमेरा लावण्यात आले होते. त्यांनी साधना, तपस्या केली त्यामुळे ३६०-३७० काहीच नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

uddhav thackeray
Exit Poll Explained: एक्झिट पोलसारखाच निकाल लागेल का? 2009, 2014 अन् 2019 मध्ये अंदाज किती बरोबर होते? जाणून घ्या

अत्यंत फ्रॉड असे एक्झिट पोल आहेत. ध्यानाला बसून जागा जिंकता येत नाहीत. इंडिया आघाडी सरकार बनवणार. आम्हाला २९५ ते ३१० इतक्या जागा मिळतील. लोकांमधून घेतलेला हा कल आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. १०० कंपन्या आहेत, एक्झिट पोल बनवणाऱ्या. ते फुकट काम करत नाहीत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं त्याचं काम असतं, असं राऊत म्हणाले.

मोठे पक्ष अशा एक्झिट पोल कंपन्यांना पैसे देतात. त्यामुळे आमचा यावर विश्वास नाही. राज्यात महाविकास आघाडीला ३५ पेक्षा जास्त जागा मिळतील. ३० तर जागा नक्कीच मिळतील. सॅम्पल सर्व्हे घेऊन कल कळत नाही, असं मत राऊतांनी व्यक्त केलंय.

uddhav thackeray
Lok Sabha Exit Poll: पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका... एक्झिट पोल येताच प्रशांत किशोर यांचे खळबळजनक ट्विट

एक्झिट पोलवर आमचा अजिबात विश्वास नाही. राज्यात कोण जिंकतंय, का जिंकतंय हे आम्हाला माहिती आहे. आम्ही काही इथे गोट्या खेळायला बसलो नाही. आमचं आयुष्य राजकारणात, पत्रकारितेत गेले आहे. यूपीमध्ये इंडिया आघाडी ३५ ते ४० जागा जिंकेल, बिहारमध्ये आरजडी १६ जागा जिंकेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ जागा मिळतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे गटाचा १८ जागांचा आकडा कायम राहील. काँग्रेसचा राज्यात बेस्ट परफॉर्मन्स असेल. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी त्यावर बोलणारच आहे. एक्झिट पोल हा कॉर्पोरेट धंदा आहे. राज्यात निकाल धक्कादायक लागणार नाही. इंडिया आघाडीच सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com