ढसाढसा रडल्यानंतर संजय राऊतांची रामदास कदमांसोबत फोनवर चर्चा | Sanjay Raut On Ramdas Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena sanjay raut on ramdas kadam cried and joining eknath shinde camp maharashtra politics

ढसाढसा रडल्यानंतर संजय राऊतांची रामदास कदमांसोबत फोनवर चर्चा

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात विधानसभेपाठोपाठ आता लोकसभेत देखील शिवसेनेला खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. दरम्यान आज रामदस कदम हे माध्यमांशी बोलताना आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आह, असे म्हणत ढसाढसा रडले यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदम यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसाठी काय त्याग केला ते सांगताना ढसाढसा रडले होते, यावर बोलताना संजय राऊतांनी त्यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, मी अनेक गोष्टींविषयी त्यांच्याशी बोललो, पक्षाला संकटाच्या काळात कशी त्यांची गरज होती ते त्यांना सांगितलं पण त्यांची स्वतःची अशी वेगळी भूमिका घेतली असे राऊत म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, रामदास कदम आणि आम्हा सगळ्यांना पक्षाने भरभरून दिलं आहे आणि ते सगळ्यांना मिळालं आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर ती मी मनात ठेवतो. मी तर कधीच मंत्री झालो नाही, ते तर अनेकदा मंत्री झाले. हे पक्षाने दिलेलं आहे. माझ्यासारख्या असंख्य लोकांना जे मिळालंय ते शिवसेना या चार अक्षरांमुळे मिळाले आहे. शिवसेना ही आमची आई आहे, आणि त्या आईचं दुध पिऊन आम्ही मोठे झालो आहोत असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा: राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

रामदास कदम काय म्हणाले होते..

रामदास कदम यांनी आज माध्यमांशी बोलताना, गेली ५२ वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिनाभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राऊतांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर, म्हणाले मॅटिनी शो देखील..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सकाळचा मॅटिनी शो आता बंद झाला आहे, ते दखल घेण्यासारखे नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावर संजय राऊतांनी प्रत्तुत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, भविष्यात २०२४ साली निवडणूका होतील तेव्हा मॅटिनी शो देखील आमचा असेल आणि सिनेमाचे सगळे शो आमचे असतील. आमचा मॅटिनी शो जरी असेल तरी मॅटिनी शोला दिवार आणि शोले पंचवीस वर्ष चालला हे लक्षात घ्या आणि आजही मराठी सिनेमा, मराठी अस्मितेचा मॅटिनीलाच चालतो, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

Web Title: Shivsena Sanjay Raut On Ramdas Kadam Cried And Joining Eknath Shinde Camp Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top