Shivsena Notice To Advocate Asim Sarode: '२ दिवसात माफी मागा अन्यथा...'; शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस, काय आहे कारण?

Shivsena Notice To Advocate Asim Sarode: शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर
Shivsena Notice To Advocate Asim Sarode
Shivsena Notice To Advocate Asim SarodeEsakal

Shivsena Notice To Advocate Asim Sarode: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच शिवसेना शिंदे गटातील १२ आमदार ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा काही दिवसांपुर्वी अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केला होता. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केलेल्या वक्तव्यावर दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

चंदपूर येथील 'निर्भय बनो' सभेत बोलताना अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांबाबत एक विधान केले होते. शिवसेना शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा असीम सरोदे यांनी केला होता. तसेच या आमदारांची यादीही असिम सरोदे यांनी वाचू दाखवली होती.

याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असे या या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.

Shivsena Notice To Advocate Asim Sarode
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज करणार शिंदे गटात प्रवेश

काय म्हणाले होते असीम सरोदे?

शिंदे गटातील काही आमदार नाराज असून ते पुन्हा काही दिवसांत ठाकरे गटात पुन्हा प्रवेश करतील असा दावा अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. सरोदे यांनी यावेळी शिंदे गटातून पुन्हा परत येण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे देखील वाचली. आमदार लता सोनावणे, आमदार श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे व प्रकाश आबिटकर हे आमदार परत येण्यास उत्सुक असल्याचे सरोदे यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे.

Shivsena Notice To Advocate Asim Sarode
NCP News: शरद पवारांचे फोटो वापरणार नाही; अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com