Accident News: शिंदे गटाचे आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: शिंदे गटाचे आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक

शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला जळगावच्या करंज गावाजवळ भीषण अपघात झाला. यात ते किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.(Latest Marathi News)

शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे काल आपल्या वाहनाने चोपडा तालुक्यातील एका कार्यक्रमावरून जळगावकडे येत असताना जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.(Latest Marathi News)

त्यांच्या कारला एमएच 19- झेड 6245 क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर लताताई सोनवणे आणि चंद्रकांत बळीराम सोनवणे या दाम्पत्यासह कारच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.(Latest Marathi News)