शिवसेना शरद पवारांच्या पाठीशी; ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राज्य सहकारी बॅंकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले असताना, शिवसेनेने मात्र ग्रामीण भागात पवारांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मुंबई : राज्य सहकारी बॅंकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले असताना, शिवसेनेने मात्र ग्रामीण भागात पवारांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

"हा महाराष्ट्र शिवबांचा आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही,' असे भाष्य पवार यांनी केले होते. पवारांच्या ट्‌विटर अकाउंटवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हे वाक्‍य रिट्‌विट केल्याने "ईडी' प्रकरणी शिवसेनेचा पवार यांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.
 

पवार यांच्या समर्थनार्थ राज्यभरात राष्ट्रवादीने आंदोलनाचा धडाका लावला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवार यांचेच ट्विट रिट्‌विट केल्याने शिवसेनेने त्याची पाठराखण केल्याचे चित्र आहे. पवारांना शिवसेनेचाही अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, असेच सध्यातरी दिसून येत आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातूनही शरद पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Supports Sharad Pawar over ED action