Shivsena Symbol: शिंदे गटाची कागदपत्रे बोगस; ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

शिवसेनेच्या दोन गटांतील चिन्हाच्या वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली
Shivsena Symbol
Shivsena Symbolesakal

शिवसेनेच्या दोन गटातील चिन्हाच्या वादावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी महत्वाचा युक्तिवाद केला. जेठमलानी यांनी २०१८ मध्ये शिवसेनेची घटना ज्या पद्धतीने बदलण्यात आली ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद यापूर्वी केला होता.

Shivsena Symbol
Shivsena Symbol Row : शिंदे गटाचा 'हा' युक्तिवाद ठाकरे गटावर भारी! वाचा जेठमलानी काय म्हणाले...

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असल्याचे शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आले होते. यावेळी चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी केला. ते म्हणाले शिंदे गटाची प्रतिज्ञापत्र बोगस आहेत.

Shivsena Symbol
Menstrual leave: मुलींना मासिक पाळीदरम्यान मिळणार हक्काची सुट्टी; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

त्यांची पडताळणी करा कोणताही एक कागद उचला आणि त्याची पडताळणी करा, ठाकरे गटाकडून आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहण्याची विनंती केली आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात सर्व कागदपत्रांची छाननी करावी त्यानंतरच निर्णयापर्यंत पोहचवं असं ही ते म्हणाले.

मात्र कपील सिब्बल यांचा शिंदे गटाचे कागदपत्रं बोगस असल्याची दावा महेश जेठमलानी यांनी हा दावा फेटाळला आहे. कागदत्रांमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचे जेठमलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार आणि खासदार यांचे बहूमत शिंदे गटाकडे आहे, असे जेठमलानी म्हणाले.

हेही वाचा-भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com