'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार झाला आहे. कोण कसे सरकार बनवतो तेच पहातो अशी अप्रत्यक्ष भाषा आणि कृती सुरू झालीय. सरकार बनवले तर कसे आणि किती दिवस टिकत ते पाहू असे शाप दिले जात आहे. महाराष्ट्राचे आपण मालक आणि देशाचे बाप आहोत या खुळ्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे.

मुंबई : 'पुन्हा आमचेच सरकार' किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांना भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला घातक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतकं मनास लावून घेऊ नका, असा वार शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाशिवआघाडीचे सरकार उदयास येत असताना भाजपकडून पुन्हा एकदा आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला झुकते माप देण्याची शक्यता

शिवसेनेने म्हटले आहे, की राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार झाला आहे. कोण कसे सरकार बनवतो तेच पहातो अशी अप्रत्यक्ष भाषा आणि कृती सुरू झालीय. सरकार बनवले तर कसे आणि किती दिवस टिकत ते पाहू असे शाप दिले जात आहे. महाराष्ट्राचे आपण मालक आणि देशाचे बाप आहोत या खुळ्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे. स्वतःच षणढत्व लपवण्यासाठी सुरू केलेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. 105 वल्यानं आधीच राज्यपालांना भेटून सांगितले आहे की आमच्याकडे बहुमत नाही, आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत. राष्ट्रपती राजवट लागताच 'आता सरकार फक्त आमचेच बरं का ! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवणत्याखालून कसे बाहेर पडणार? लोकशाही आणि नैतिकतेचा खून करून आकडा लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही, मग बोलणाऱ्या तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याचे वाचन देणाऱ्याचा हा खोटारडेपणा अणे आणि तो पुन्हापुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा कमरपट्टा घेऊन येथे कोणी जन्मास आले नाही. एक बाजूला फडणवीस 'राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार!'असा दावा करतात तर दुसरीकडे गडकरी यांनी क्रिकेटचे रबरी चेंडू राजकारणात टोलावले आहेत. क्रिकेट आणि राजकारण अंतिम काही नाही, कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरू शकतो. एका क्षणी हातातून गेलेल्या सामन्यात विजय मिळू शकतो असा सिद्धांत गडकरी मांडतात. गडकरी यांच्या क्रिकेटशी संबंध नाही, त्यांचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर यांच्याशी आहे.... संबंध असलाच तर शरद पवार आणि क्रिकेटचा आहे. क्रिकेटच्या खेळात राजकारणाप्रमाणे  फोडाफोडी आणि फिक्सिंगचा खेळ मैदानावर सुरू झालाय. त्यामुळे खेळ जिंकतो की फिक्सिंग जिंकते  हा संशय राहातोच. गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय खेळास क्रिकेटच्या रोमांचक खेळाची दिलेली उपाधी योग्य आहे. राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते पंच फूटल्यावर (किंवा फोडल्यावर) पराभवाच्या टोकाला गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. आता आमचेच सरकार! त्यातून जागा झाला असेलही. पण मैदानात स्टंप नावाची दांडकी आहेत ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena targets BJP in saamana editorial