Shiv Sena : मान्य करुनही व्हिप बजावला, ठाकरे गट पुन्हा कोर्टात जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Shiv Sena : मान्य करुनही व्हिप बजावला, ठाकरे गट पुन्हा कोर्टात जाणार

मुंबईः शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी काल शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. या व्हिपमुळे ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून सुनिल प्रभू यांनी पुन्हा कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला व्हिप बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली असतांना काल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरद गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवत शिवसेनेला व्हिप बजावता येणार नाही, असं म्हणत पुढची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे. गोगावले म्हणाले की, आम्ही ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात व्हिप बजावला आहे. आम्ही कुणावरही कारवाई करत नाही. सध्या फक्त अधिवेशनाला पूर्णवेळ हजर राहण्यासंदर्भात व्हिप बजावला आहे. कारवाईसंबंधीचा विचार दोन आठवड्यांनी करु, असंही गोगावले म्हणाले.

त्यावर आज ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वोच्च न्यायालयात मान्य करुनही त्यांनी व्हिप काढला असल्याने आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जावू, असं प्रभू म्हणाले आहेत.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray