Shivsena Mla Disqualification Result: 'मेलच आलेला नाही....', ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांची निकालाआधी मोठी माहिती

Shivsena Mla Disqualification Result: . शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत.
Shivsena Mla Disqualification Result
Shivsena Mla Disqualification ResultEsakal

मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता. १०) संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत. मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे ?

"अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे. मात्र, आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?"

Shivsena Mla Disqualification Result
Shivsena : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, शिंदे-फडणवीस-पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा; घडामोडींना वेग

"कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का??" ,असं प्रश्न सरोदेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.

Shivsena Mla Disqualification Result
Shiv Sena Politics : 'असा' निर्णय घेतल्यास ते 40 आमदार अपात्र ठरतील; निकालापूर्वीच आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार

1) एकनाथ शिंदे

2) चिमणराव पाटील

3) अब्दुल सत्तार

4) तानाजी सावंत

5) यामिनी जाधव

5) संदीपान भुमरे

7) भरत गोगावले

8) संजय शिरसाठ

9) लता सोनवणे

10) प्रकाश सुर्वे

11) बालाजी किणीकर

12) बालाजी कल्याणकर

13) अनिल बाबर

14) संजय रायमूळकर

15) रमेश बोरनारे

16) महेश शिंदे

Shivsena Mla Disqualification Result
Latest Marathi News Live Update : राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ संपण्याची चिन्हे! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी

2) रवींद्र वायकर

3) राजन साळवी

4) वैभव नाईक

5) नितीन देशमुख

6) सुनिल राऊत

7) सुनिल प्रभू

8) भास्कर जाधव

9) रमेश कोरगावंकर

10) प्रकाश फातर्फेकर

11) कैलास पाटील

12) संजय पोतनीस

13) उदयसिंह राजपूत

14) राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com