
Shivsena Row : "जो रामाचा, हनुमानाचा नाही..."; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका
'शिवसेना' हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यावरुन नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचारधारा पुढे जिवंत ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले नाहीत, ते सत्तेसाठी संघर्ष काय करू शकणार? मुख्यमंत्री शिंदे हेच बाळासाहेबांची विचारधारा आणि धनुष्यबाण पुढे नेतील, असा माझा ठाम विश्वास आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच ते निवडणुकीत उतरवतील."
जो राम हनुमान का नहीं उनके पास धनुष्य बाण का क्या काम, असं ट्विट नवनीत राणा यांनी केलं आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे.