esakal | 'गोव्यातील फोडाफोडीचं राजकारण थांबवू, शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढणार'
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

'गोव्यात फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढणार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : येत्या काही महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणुका (Goa assembly election) होऊ घातल्या आहेत. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा गोव्याला प्रचारासाठी जात होते. आमचे तिकडे संघटन आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना साधारण २२ जागा लढवू, असे शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) म्हणाले. आज ते गोवा दौऱ्यासाठी निघाले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा: 2024 मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत;पाहा व्हिडिओ

संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. गोव्यातील गावात देखील अंमली पदार्थांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तसेच गोव्यात कॅसिनोचा कहर आहे. त्याविरोधात संघर्ष करू, असं सांगत भाजप सत्तेत आले. मात्र, आता त्याच कॅसिनोला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांच्या आशीर्वादाने सर्व धंदे चालतात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्र आणि गोव्याची संस्कृती जवळपास सारखी आहे. आपल्या शेजारील राज्य आहे. मात्र, आता येथे बंगालच्या तृणमुल काँग्रेसने प्रवेश केला आहे. मग, आम्ही का नाही लढणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोव्याचं सरकार नवनवीन थापा मारतात. त्यांना जनतेने सबक शिकविणे गरजेचे आहे. तो सबक फक्त शिवसेना शिकवू शकते. गोव्यात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू. तिथे संघटनाची गरज आहे, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात आम्ही कुठेही फोडाफोडी केली नाही. किमान समान कार्यक्रम ठरवून तीन पक्ष एकत्र आलो. त्यामुळे गोव्याची तुलना महाराष्ट्रासोबत होऊ शकत नाही. कारण, गोव्यात कोण कोणासोबत कधी जाईल हे सांगता येत नाही. गोव्यातील जनता एका आमदाराला मत देते. निवडून आल्यानंतर तोच आमदार दुसऱ्या पक्षात जातो. गोव्यातील हे फोडाफोडीची राजकारण कुठंतरी थांबवायला हवं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गोव्यात शिवसेनेची कोणासोबत आघाडी झाली तर ठीक आहे. नाहीतर शिवसेना एकटी लढेल, असेही राऊत म्हणाले.

loading image
go to top