शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahir Babasaheb Purandare

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

शिवशाहिर बाबासाहेब अर्थात बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे यांचे आज निधन झाले आहे. ते 100 वर्षांचे होते. आज सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी.......त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला...बाबासाहेबांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वृद्धापकाळानं त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचं जाणं साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलं आहे.

बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. बाबासाहेबांनी राज्यासह देशातील अनेक किल्ल्यांवर भटकंती केली होती. काही झालं तरी शिवाजी राजांचे विचार सर्व सामान्यांपर्यत जायला हवेत या भावनेनं त्यांनी साहित्याच्या आधारातून जनजागृती केली. त्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित भव्य अशा राजा शिवछत्रपती नाटकाची निर्मितीही केली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद दिला होता.

loading image
go to top