
बार्शीत क्रूरतेचा कळस! पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन छाटली बोटं
सोलापूर मधील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर काही राजकीयपक्षाच्या संबंधित गुंडांनीबलात्कार करून पीडित अल्पवयीन मुलीची बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या मुलीवर पाच मार्च रोजी दोन नराधमांनी बलात्कार केला त्यानंतर सहा मार्चला पिडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. याचा राग मनात धरून नराधमांनी पिडित मुलीच्या घरात जावून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल करून ही दोन दिवसांनंतर आरोपींना अटक केली. कामात हलगर्जीपणा केला म्हणून API महिला आणि दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित केले आहेत. तर पीडित मुलीवर बार्शीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. राऊत यांनी ट्विट केलं आहे की, देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.