धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

मोबाईल वापरायला का दिला नाही, म्हणून एका १३ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास पेनूर (ता. मोहोळ) येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
mohol suscide

mohol suscide

sakal

Updated on

मोहोळ : मोबाईल वापरायला का दिला नाही, म्हणून एका १३ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास पेनूर (ता. मोहोळ) येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

१३ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येबद्दल मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेनूर येथील धर्मराज डोके हे कुटुंबासमवेत टेकळे वस्ती (पेनूर) येथे राहतात. डोके कुटुंब शेती करून उपजीविका भागवितात. १ मार्च रोजी सायंकाळी सातपूर्वी राहत्या घरी यशराजने मोबाईल वापरण्यास न दिल्याच्या रागातून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी यशराज घराची कडी का उघडत नाही, म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून दरवाजाची कडी तोडली.

त्यावेळी यशराज हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तत्काळ खाली उतरवून पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याला तपासून डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार गणेश नाळे करीत आहेत.

आई-वडील जाणार होते आदमापूरला, पण...

यशराज हा इयत्ता सातवीत शिकत होता. परीक्षा जवळ आल्याने आई-वडील त्याला अभ्यास करायला सांगत होते. त्याचे आई-वडील सोमवारी (ता. २) संत बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूर येथे जाणार होते. त्यावेळी आई-वडिलांनी जाताना मोबाईल घरी माझ्याकडे ठेवावा, असा हट्ट यशराज करीत होता. पण, आई-वडिलांनी त्याला मोबाईल दिला नाही. त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com