खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी मीटरचा तुटवडा - चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

ऊर्जा मंत्रालय महावितरणच्या विद्युत निर्मिती कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात असून, मीटरचा तुटवडा हा त्याचाच एक भाग असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी मीटरचा तुटवडा - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दोन वर्षांत विद्युत मीटरचा (Electric Meter) ऐतिहासिक तुटवडा (Shortage) निर्माण झाला असून, खासगी कंपन्यांच्या (Private Company) फायद्यासाठी तो जाणिवपूर्वक निर्माण केला जात असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला आहे.

ऊर्जा मंत्रालय महावितरणच्या विद्युत निर्मिती कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात असून, मीटरचा तुटवडा हा त्याचाच एक भाग असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यात वाढत्या तापमानामुळे विद्युत मीटरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर नवीन विद्युत मीटरची मागणी देखील वाढली आहे. हे मीटर महावितरणकडून उपलब्ध होणे अपेक्षित असताना ते बाजारपेठेतून विकत घेण्यास सांगितले जात आहे. अशाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून, हा अन्याय असल्याची भूमिका आ. बावनकुळे यांनी व्यक्त केली.

महावितरणकडून ज्या ‘थ्री फेज’ मीटरसाठी १ हजार ५९६ रुपये घेतले जायचे तेच मीटर आता बाहेरून विकत घेतल्यास ४ हजारांच्या घरात जाणार आहे. तर ‘सिंगल फेज’ मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १ हजार ८०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, बाजारातून मीटर विकत घेतल्यास त्याचे जोडणी शुल्क वेगळे द्यावे लागेल. आजच्या घडीला राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत तर २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यानंतरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Shortage Of Meters Benefit Of Private Companies Chandrashekhar Bawankule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..