NCP Banner: ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, राष्ट्रवादी काँग्रेसने लावले बॅनर

ईडीच्या कारवाईविरोधात लागलेले बॅनरची चर्चा राजकीत वर्तुळात सुरु झाली आहे
NCP Banner
NCP BannerEsakal

राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरु असते. कोणत्याही विषयावरून आजकाल बॅनर लागण्याचे दिसून येतात. यावरून टीका, आरोप-प्रत्यारोप होतात. अशातच आता केंद्र सरकारकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी)चा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, असं लिहालं आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी ED ने नोटीस पाठवली आहे. त्याविरोधात जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत.

NCP Banner
kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, बापाला मारल्याचा घेतला बदला

'भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा', असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा “जाहीर निषेध” चा डिजिटल बोर्ड लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

NCP Banner
Sameer Wankhede : "देशभक्त असल्याची शिक्षा..."; CBI छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

NCP Banner
Karnataka Election Result: अजित पवारांच सूचक ट्विट; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com