
मुंबई : सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज झाला आहे. उद्या (ता. ८) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. एकाच ठिकाणी २१ संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली आहे.