'शरद पवारांचा तो शब्द अन् अवघ्या 1 मतानं वाजपेयी सरकार कोसळलं' I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Bihari Vajpayee Sharad Pawar

शरद पवारांच्या सांगण्यावरून रामशेठ ठाकुरांनी 'ते' मत बाजूला दिलं होतं.

'शरद पवारांचा तो शब्द अन् अवघ्या 1 मतानं वाजपेयी सरकार कोसळलं'

सातारा : रामशेठ, तुमचं सामाजिक कार्य अलौकिक आणि तितकंच महत्वाचंही आहे. जनतेला तुमची राजकीय कारकिर्द देखील माहितीय, असं म्हणत तुमच्यामुळं एका 'रामभरोसे' पंतप्रधानाला पायउतार व्हावं लागलं, असा किस्सा खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी आज साताऱ्यात रामशेठ ठाकूर यांच्याबाबत सांगितला. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा (Satara) छत्रपती शिवाजी काॅलेजच्या (Chhatrapati Shivaji College) नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यात आलेत.

हेही वाचा: 'भविष्यात भाजप आमदाराच्या पाठीशीच ठाम उभं राहणार'

या कार्यक्रमास रयत संस्थेचे संचालक रामशेठ ठाकूर (Ramsheth Thakur), कार्याध्यक्ष डाॅ. अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमादरम्यान खासदार पाटील यांनी रामशेठ ठाकूर यांच्याबाबत घडलेला एका किस्सा सांगितला. ते म्हणाले, रामशेठ ठाकूर यांच्या एका निर्णयक मतामुळं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना (Atal Bihari Vajpayee) पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी शरद पवारांच्या सांगण्यावरून, रामशेठ ठाकुरांनी मत बाजूला दिल्यानं हे घडल्याचं खासदार पाटलांनी नमूद केलं.

हेही वाचा: राजकारण तापलं! 'माता सीतेशिवाय राम पूर्णच होऊ शकत नाही'

पाटील पुढे म्हणाले, रामशेठ ठाकूर हे शेकाप पक्षात होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रामशेठ ठाकुरांनी त्यांचं मत बाजूला दिलं आणि सन 1999 कालावधीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं, ही आठवण खासदार पाटलांनी कार्यक्रमात ताजी केली आणि तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्या किस्याला दाद दिली.

Web Title: Shrinivas Patil Told The Story About Ramsheth Thakur Sharad Pawar And Atal Bihari Vajpayee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..