
बीड : संसदेपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे उलटले तर अद्याप काही संशयित फरारी आहेत. त्यांना अटक आणि सुत्रधारावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याच्या मागणीचा रेटा जिल्ह्यात कायम आहे. याच मागणीसाठी शनिवारी (ता. २८) बीडमध्ये सर्व जातीय, सर्व पक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.