esakal | मुख्यमंत्री माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला - नारायण राणे

मुख्यमंत्री माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला - नारायण राणे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मालवण: "माझ्या जीवनातील आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. अशावेळी कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटतं होत. आपणं जावं, शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमातनळावरुन उडणारं विमान डोळे भरून पाहावं या स्तुत्य हेतूने आलो होतो, आहे. विमानतळ पाहिलं, विमान पाहिलं फार बरं वाटलं" असं नारायण राणे (narayan rane) म्हणाले. चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

"मी मंचावर आलो. मंचावर येत असताना मुख्यमंत्री भेटले, माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला" असो, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा: Chipi Airport: 'शेवटी पायगुण लागतो', मंचावरुनच सुभाष देसाईंचा टोमणा

"विमानतळ होणं आवश्यक आहे. प्रवाशांना सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. देशा-परदेशातील पर्यटकांनी पाच-सात दिवस इथे येऊन राहिलं पाहिजे. चार ते पाच लाख खर्च केले पाहिजेत. त्यातून सिंधुदुर्गातील उद्योजक-व्यावसायिकांना पैसे मिळाले पाहिजेत. आर्थिक समृद्धी जिल्ह्यात आली पाहिजे हाच विमानतळामागे माझा उद्देश होता" असे नारायण राणे म्हणाले.

loading image
go to top