राष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्याशी संबंधात पुन्हा 'बीड'चे नाव

यापूर्वी पुणे येथील बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात जबियोद्दीन अन्सारी याचा थेट संबंध तपासात उघड झाला होता
beed
beedbeed

बीड/सिरसाळा: विविध कारणांनी कायम चर्चेत राहणाऱ्या बीड जिल्ह्याचा अलिकडच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांशीही थेट संबंध आला आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने (UP ATS) मुकबधीराचे धर्मांतर केल्याचा आरोपाखाली पकडलेल्या तीन आरोपींत जिह्यातील इरफान खाजाखाँ पठाण (Irfan Pathan) हा युवक जिल्ह्यातील आहे. सिरसाळा (ता. परळी) हे त्याचे मुळ गाव असून सध्या तो दिल्लीतील केंद्रीय बालविकास मंत्रालयात इंरप्रिटेटर म्हणून कार्यरत आहे.

यापूर्वी पुणे येथील बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात जबियोद्दीन अन्सारी याचा थेट संबंध तपासात उघड झाला होता. तर, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अबु जिन्दाल याचा थेट संबंध होता. मागच्या काही दिवसांपूर्वी गाजलेल्या टुल किट प्रकरणातही जिल्ह्यातील अभियंता असलेल्या शंतनु मुळूक याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. वरील तीनही प्रकरणे राष्ट्रीय पातळीवरील होती. आता उत्तर प्रदेशात धर्मांतर केल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या तिघांमध्ये सिरसाळा येथील इरफान पठाण याचा समावेश आहे. इरफानचे वडील सध्या सिरसाळ्यात राहतात.

beed
PHOTOS: लडाखमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांची सैर करा फोटोंमधून

इरफान हा सर्वात लहान असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. परळीत उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर साईन लँग्वेज विषयात त्याने मुंबईतून पदवी मिळविली. सध्या दिल्लीला राहत असून चार वर्षांपासून केंद्रीय बालविकास मंत्रालयात नोकरीलाही आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याने गावी भेट दिल्याचे चुलतेही नातेवाईकांनी सांगितले. इरफानकडून असा प्रकार घडला असण्याची शक्यता त्याच्या भावाने फेटाळली आणि हा प्रकार कळल्यानंतर धक्का बसल्याचेही तो म्हणाला. इरफान एक चांगला मुलगा असल्याचे सांगत "ऐसा काम नही कर सकता, सत्य चौकशीत समोर येईलच तेंव्हा कळेल, असं इरफानच्या अजून एका नातेवाईकाने सांगितले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खान याचे कौतुक केले होते. २०१५ मध्ये त्याचा विवाह झालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com