Viral Video : पैज हरले! दहावीच्या निकालानंतर बहिणीचे पाय धुवून भाऊ प्यायले पाणी

SSC Exam Result : दहावीत शिकणाऱ्या बहिणीसोबत तिच्या लहान भावांनी एक अनोखी पैज लावली होती. त्या पैजेत हरल्यानंतर तिचे पाय धुवून भाऊ पाणी प्यायले.
Brothers wash sister’s feet after she scores 80% in SSC exam
Brothers wash sister’s feet after she scores 80% in SSC exam Esakal
Updated on

दहावीच्या निकालानंतर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लहान भावांनी आपल्या मोठ्या बहिणीसोबत लावलेल्या पैजेबाबत आहे. दहावीत शिकणाऱ्या बहिणीसोबत तिच्या लहान भावांनी एक अनोखी पैज लावली होती. तुला जर ८० टक्के गुण मिळाले, तर तुझे पाय धुवून आम्ही ते पाणी पिऊ असं भाऊ म्हणाले होते. आता बहिणीने ८० टक्के गुण मिळवल्यानंतर भावांना त्यांनी लावलेली पैज पूर्ण करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com