'कोपर्डी'नंतरचे सहा महिने...

सकाळ ऑनलाईन न्यूज
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

कोपर्डी घटनेला आज (शुक्रवार) सहा महिने पूर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिमुकल्या गावातील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने केवळ जिल्हा नव्हे; राज्य नव्हे तर देश हादरला. आरोपींना अटक झाली. यथावकाश कोर्टात केस सुरू झाली. घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांनी नवा इतिहास लिहिला, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीदेखील घेतली. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मोर्चेकरांनी मौनातून अफाट भाष्य केले. 

कोणी या मोर्चांना जातीचे स्वरूप मानले; कोणी सामाजिक बदल म्हणून पाहिले; तर कोणी नव्या राजकीय परिमाणांचे संदर्भ मानले. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज संघटित झाला, तसे अन्य जाती-समुदायांचे मूक मोर्चेही महाराष्ट्रात निघाले. मोर्चांनी त्यांच्या त्यांच्या समुदायाचे प्रश्न रस्त्यांवर उतरून ठामपणे मांडले. काही प्रश्न सुटण्याच्या दिशेने राजकीय सत्ताधाऱयांनी पाऊलही टाकले. 

अनन्वित छळ आणि अत्याचाराच्या रूपात मृत्यूने कोपर्डीतील त्या भगिनीला गाठले. या घटनेचा निषेध सगळ्या स्तरांतून पोटतिडकीने झाला. घटनेप्रकरणी अटक केलेल्या नराधमांना न्यायालय शिक्षा करेलच; पण आपण समाज म्हणून या सहा महिन्यांत स्त्रियांवरील अत्याचाराबाबत सजग झालो का? की केवळ जातीपातीत आणखी घट्ट बांधले गेलो? 

एक सुजाण नागरीक म्हणून 'कोपर्डी'नंतरच्या सहा महिन्यांकडे आपण कसे पाहतो?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six months after brutal gang rape in Kopardi