Maharashtra Budget 2019 : सार्वजनिक बांधकाम विभागासाठी साडेसोळा हजार कोटी : अर्थमंत्री

टीम ई-सकाळ
मंगळवार, 18 जून 2019

- सार्वजनिक बांधकाम विभागासाठी करण्यात आली 16 हजार 525 कोटी रूपयांची तरतूद.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. 18) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 16 हजार 525 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. 

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम क्षेत्रासाठी विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यामध्ये दिव्यांगांना घरकुल योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. राज्य सरकारच्या माध्यमातून 80 टक्के दिव्यांगांना घरे बांधून देण्यात येणार आहे. रस्ते विकासासाठी चार हजार 245 कोटींची तरतूद करण्यात आली. सायन-पनवेल मार्गावर खाडी पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली. तसेच 3 लाख कोटींच्या रस्ते बांधणीला मंजुरी देण्यात आली. मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 

दरम्यान, रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी 606 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच दर्जेदार रस्त्यांसाठी आपली समृद्धीकडे वाटचाल, पायाभूत सुविधा देण्यावर सरकारचा भर आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen Thousand Crores For PWD says Sudhir Mungantiwar