
मूर्तिजापूर : शहरातील कारंजा टी-पॉईंट जवळील उड्डाण पुलावर बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनातून तब्बल १४९ गोवंशांची कातडी व चरबी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिली. याबाबत मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.