गुंगीचे औषध टोचून मोकाट जनावरांची तस्करी! सोलापुरात गोरक्षकांनी कारमधील जनावराची केली सुटका, तिघांवर गुन्हा; गाडीत औषधाची बाटली, जमावाने गाडी फोडली

सोलापुरातील बागवान नगर परिसरातील दोन जनावरे कारमध्ये (एमएच १४ सीके ३५४२) घालून नेण्याचा प्लॅन गोरक्षकांनी हाणून पाडला. कारमध्ये एक गीर जातीचे खोंड निर्दयीपणे डांबून ठेवलेले होते. कारशेजारी देशी गाय तोंडाला फेस आलेल्या स्थितीत पडली होती. त्याठिकाणी जमलेल्या जमावाने कारची तोडफोड केली. हा प्रकार ३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. यात जनावरे चोरी करणाऱ्या कार चालकासह तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Cattle Rescue
Cattle Rescuesakal
Updated on

सोलापूर : येथील बागवान नगर परिसरातील दोन जनावरे कारमध्ये (एमएच १४ सीके ३५४२) घालून नेण्याचा प्लॅन गोरक्षकांनी हाणून पाडला. कारमध्ये एक गीर जातीचे खोंड निर्दयीपणे डांबून ठेवलेले होते. कारशेजारी देशी गाय तोंडाला फेस आलेल्या स्थितीत पडली होती. त्याठिकाणी जमलेल्या जमावाने कारची तोडफोड केली. हा प्रकार ३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. यात जनावरे चोरी करणाऱ्या कार चालकासह तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील सुनील नगरात यापूर्वी देखील दोन गायी चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता. गोरक्षकांना खबर लागताच ते घटनास्थळी येत असताना गायी चोरणारे पसार झाले होते. दरम्यान, ३ ऑगस्टच्या प्रकाराबद्दल जयप्रकाश नारायण नगरातील दीपक राजू चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या बागवान नगर परिसरात रोडलगत गायीचा गोठा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे गीर जातीचे एक खोंड या चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय दादाराव भोसले यांची देशी कालवड आणि खंडू कसबे यांच्या देशी गायीला नायलॉनच्या दोरीने बांधून निर्दयीपणे जखमी करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झालेल्या तिघांमधील एकजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारमध्ये औषधाच्या बाटल्या, अन्...

बागवान नगरात कारमध्ये कोंबून गोवंशाची चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कार जप्त केली आहे. दरम्यान, या कारमध्ये औषधाच्या लेबल नसलेल्या दोन बाटल्या होत्या. गोवंशाला चोरून नेण्यापूर्वी त्यांना हेरून गुंगीचे औषध दिले जाते. त्यांना गुंगी चढल्यानंतर दोरीने निर्दयीपणे बांधून वाहनातून चोरून नेले जाते, असा संशय गोरक्षकांना आहे. पण, त्या बाटल्या नेमक्या कशाच्या होत्या, त्यात काय औषध होते हे गुलदस्तातच आहे. तसेच जी जनावरे चोरून नेली जात होती, त्यांच्या कानाला कोणताही टॅग नव्हता, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com