
...तर उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणांची खळबळजनक मागणी
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं नुकतीच अटक केली त्यानंतर आज कोर्टानं त्यांना ती दिवसांची ईडी कोठडी सुनावली. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक नेत्यांची अशा घोटाळ्यांमध्ये नावं येत असल्यानं जर या सर्वांची लिंक मातोश्रीपर्यंत जात असेल तर उद्धव टाकरेंची देखील चौकशी करा, अशी खळबळजनक मागणी अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. (so investigate Uddhav Thackeray too Sensational demand of MLA Ravi Rana)
हेही वाचा: Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
राणा म्हणाले, "ईडी एक सक्षम यंत्रणा असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून ईडी, सीबीआय काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, ज्या राज्यांमध्ये सरकारमधील लोकांनी घोटाळे केले. तसेच ज्या सरकारांनी घोटाळेबाजांना पाठीशी घातलं अशा लोकांवर करवाईसाठी आपण ईडीकडं नेहमी तक्रारी करतो. ईडी ही सक्षम यंत्रणा असल्यानं ज्या प्रकारे त्यांनी संजय राऊतांना अटक केली. त्याचप्रमाणे भविष्यात अनिल परब देखील गजाआड जातील. पण या सर्वांच्या लिंक जर मातोश्रीवर जात असतील उद्धव ठाकरेंशी त्यांची लिंक लागत असेल तर उद्धव ठाकरेंची देखील चौकशी झाली पाहिजे"
हेही वाचा: अशोक चव्हाण भाजपत जाणार का? स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं ४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळं राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. ईडीनं रविवारी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
Web Title: So Investigate Uddhav Thackeray Too Sensational Demand Of Mla Ravi Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..