"माई गेल्या नाहीत..."; सिंधुताईंची लेक ममतांनी फोडला हंबरडा

सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Mamata Sapkal
Mamata SapkalTeam eSakal

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजारी असल्यानं ताईंना वारंवार उलट्या होत होत्या, त्यामुळे त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. त्यानंतर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनीटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या बाहेर हंबरडा फोडला.

Mamata Sapkal
Sindhutai Sapkal Dies: अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

आई गेल्याचं दु:ख कुणालाच सहन होण्यासारखं नाही. सिंधुताईंचं कुटुंब तर आता फार मोठं झालेलं आहे. त्यांच्या शेकडो मुलं, मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. याबद्दल बोलताना त्यांची कन्या ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ममता यांनी बोलण्यास सुरूवात करताच माई गेल्या असं कुणीही म्हणू नका असं आवाहन केलं. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे. माईनं केलेल्या कामाच्या स्वरुपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील. त्यांनी आता पर्यंत निर्माण करून ठेवलेलं सगळं इथून पुढेही असंच सुरू राहील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Mamata Sapkal
मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली

सिंधुताई सपकाळ 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांचं निधन झालं. महिनाभरापूर्वी त्यांचं हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(Sindhutai Sapkal Death News) त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com