Barshi Fire Video : महिलांचे मृतदेह उडून ऊसाच्या शेतात पडले... लोक तडफडत होते; तासभर कोणतीच मदत मिळाली नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Barshi Fire

Barshi Fire Video : महिलांचे मृतदेह उडून ऊसाच्या शेतात पडले... लोक तडफडत होते; तासभर कोणतीच मदत मिळाली नाही

सोलापूरः सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्थानिकांच्या दाव्यानुसार ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की कामगारांचा जागेवरच कोळसा झाला.

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ हा फटाक्यांचा कारखाना होता. आज या कारखान्यात फटाके बनवण्याचं काम सुरु असतांना भीषण स्फोट झाला. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात ४० जण काम करीत होते.

या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर साधारण पाच लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. वेळेत मदत न मिळाल्याने काहींचा तडफडून मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. मृत्यूच्या आकड्यांबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

मदतकार्यामध्ये सहभागी एका गावकऱ्याने सांगितलं की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही मदतीसाठी धावून आलो. ऊसाच्या शेतात दोन महिलांचे मृतदेह उडून पडले होते. काही तडफडत पडले होते. आम्ही पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला.

तब्बल तासभर १०८ रुग्णवाहिका, पोलिस किंवा दुसरी रुग्णवाहिका आली नाही. तेथे उपस्थित असलेले लोक तासभर फोन करत होते. परंतु कुणीही फिरकलं नसल्याचं गावकऱ्याने सांगितलं.

बार्शीच्या या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील लोक काम करायचे. सध्या आग विझवण्याचं काम सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Solapurfirebarshi