सोलापुरात कोरोनाचा उच्चांक ! ग्रामीणमध्ये 107 तर शहरात 86 रुग्ण; पेन्डिंग 290 रिपोर्टने वाढविली चिंता 

तात्या लांडगे
Saturday, 11 July 2020

ठळक बाबी... 

  • सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता तीन हजार 161 तर 298 जणांचा मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील 15 हजार 177 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; 234 अहवाल प्रलंबित 
  • आतापर्यंत शहरातील एक हजार 749 रुग्णांनी कोरोनावर केली मात; एक हजार 114 रुग्णांवर उपचार 
  • सेटलमेंट फ्रि कॉलनी, उमेदपूर रोड येथील 75 वर्षीय तर बेगम पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • शहर-जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता तीन हजार 977 झाली; 332 जणांचे कोरोनामुळे झाला मृत्यू 

सोलापूर : कोरोनाचा प्रवेश सोलापुरात होऊन उद्या (रविवारी) तीन महिने पूर्ण होत असतानाच शनिवारी शहर-जिल्ह्यात सर्वाधिक 193 रुग्णांची भर पडली. त्यामध्ये शहरात 86 तर ग्रामीण भागातील 197 रुग्णांचा समावेश असून शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील 234 तर ग्रामीणमधील 56 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने आता उद्या किती रुग्णांची भर पडणार याची चिंता सोलापुरकरांना लागली आहे. 

अभिषेक नगरात सहा, उत्तर कसब्यात दोन, होटगी रोडवर दोन, न्यू पाच्छा पेठेत तीन, बुधवार पेठेत तीन, रामलाल नगरात दोन, कुमठ्यात चार, लक्ष्मी नगर, राहूल नगर (हत्तुरे वस्ती) प्रत्येकी दोन, भवानी पेठ (मराठा वस्ती) येथे चार, कोंडा नगर (अक्‍कलकोट रोड) येथे दोन, सेटलमेंट कॉलनी क्र. एक येथे तीन, शहा नगर (लिमयेवाडी) दोन, जोडभाव पेठेत चार, मल्लिकार्जुन नगरात पाच, चिंता नगरात (निराळे वस्ती) तीन रुग्णांची भर पडली आहे. सेटलमेंट कॉलनी क्र. सहा, मल्लिकार्जुन नगर, जुनी मिल चाळ, लक्ष्मी पेठ, अभिषेक नगर, बनशंकरी नगर, सिध्देश्‍वर नगर (मजरेवाडी), वृदांवन सोसायटी, ओम नम: शिवाय नगर, गोंधळे वस्ती, रेल्वे लाईन, गिता नगर (न्यू पाच्छा पेठ), कलावती नगर, भूलक्ष्मी नगर (एमआयडीसी), आंबेडकर सोसायटी (कुमठा नाका), रविवार पेठ, अभिमान श्री कॉम्प्लेक्‍स, टिळक चौक, शेळगी, जवाहर सोसायटी, कुमठा नाका (स्वागत नगर), शिवाजी नगर (मोदी), बसवेश्‍वर नगर, आत्मविश्‍वास नगर, मंगळवार बाजार, एन जी मिल चाळ, आदर्श नगर, खडक गल्ली (बाळे), साईबाबा चौक, अवंती नगर आणि वरद फार्म याठिकाणी शनिवारी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता तीन हजार 161 तर 298 जणांचा मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील 15 हजार 177 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; 234 अहवाल प्रलंबित 
  • आतापर्यंत शहरातील एक हजार 749 रुग्णांनी कोरोनावर केली मात; एक हजार 114 रुग्णांवर उपचार 
  • सेटलमेंट फ्रि कॉलनी, उमेदपूर रोड येथील 75 वर्षीय तर बेगम पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • शहर-जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता तीन हजार 977 झाली; 332 जणांचे कोरोनामुळे झाला मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur city and rural area total Patient Anxiety raised by pending 290 report