सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

सोलापुरातील नई जिंदगीतील बसवेश्वर नगरातील गौरीशंकर नागनाथ कोळी यांच्या घरातून चोरट्याने पाच लाखांचे दागिने चोरून नेले होते. त्यात त्यांच्या पत्नीचे २५-३० वर्षांपूर्वी घेतलेले मंगळसूत्र, बोरमाळ, पैंजण होते. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघा चोरट्यांना २४ तासांतच जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरीचे सगळे दागिने हस्तगत केले आहेत.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : येथील नई जिंदगीतील बसवेश्वर नगरातील गौरीशंकर नागनाथ कोळी यांच्या घरातून चोरट्याने पाच लाखांचे दागिने चोरून नेले होते. त्यात त्यांच्या पत्नीचे २५-३० वर्षांपूर्वी घेतलेले मंगळसूत्र, बोरमाळ, पैंजण होते. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघा चोरट्यांना २४ तासांतच जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरीचे सगळे दागिने हस्तगत केले आहेत.

फिर्यादी गौरीशंकर कोळी हे शेजारील खोली बंद करून दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यावेळी दोघांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरून नेले होते. घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, पण दूरवरील कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले होते. त्यावरून गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकांनी चोरट्यांचा शोध घेतला. जिबरान ऊर्फ शोएब युनूस शेख (वय २१, रा. बसवेश्वर नगर, नई जिंदगी) व प्रशांत नागेश खदारे (वय १९, रा. केशवनगर, मौलाली चौक) अशी त्या चोरट्यांची नावे आहेत.

जिबरानविरुद्ध पूर्वीचे देखील सदर बझार पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. चोरट्यांना पकडून दागिने जप्त केल्याचे समजताच फिर्यादी कोळी व त्यांच्या पत्नीने पोलिसांचे आभार मानले.

सहा महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत चोरी करणारा आता सापडला

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या रोहिणी विकास कुंभारकर (रा. मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे) यांच्या हातातील १९ ग्रॅमचे सोन्याचे कडे चोरीला गेले होते. कुंभारकर यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद नोंदविली, काही दिवस पाठपुरावा देखील केला; मात्र चोरटा सापडत नव्हता. २८ जानेवारीपासून सदर बझार पोलिस त्या चोरट्याच्या शोधात होते. पोलिसांनी खबरे देखील कामाला लावले होते. यात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या चोरट्याला सत्तर फूट रोड परिसरातील सराफ बाजारात दागिने विकायला आल्यावर सापळा रचून पकडले. पियुष राजू शिंदे (रा. भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेले कडे हस्तगत केले आहे. पोलिस आयुक्त डॉ. एम. राज कुमार, उपयुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित जेरबंद
solapur city gold theft
Solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com