सोलापुरातील वाहतूक पोलिसांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे! एक हवालदार निलंबीत, दुसऱ्याकडून दुचाकीस्वारास शिवीगाळ; ‘एसपीं’नी दिले ‘हे’ ७ निर्देश, वाचा...

सोलापूर शहरातील वाहतूक पोलिसांकडून नागरिकांशी नम्र आणि सौजन्यपूर्ण वर्तन व्हावे, कारवाई अधिक पारदर्शक व्हावी तसेच गैरवर्तनाच्या तक्रारींना आळा बसावा, यासाठी वाहतूक शाखेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्य वर्दळीच्या चौकांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येणार आहेत.
बेशिस्त वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांच्या शर्टावर आता बॉडी वोर्न कॅमेरा
बेशिस्त वाहनधारकांनो सावधान! वाहतूक पोलिसांच्या शर्टावर आता बॉडी वोर्न कॅमेरा Canva
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक पोलिसांकडून नागरिकांशी नम्र आणि सौजन्यपूर्ण वर्तन व्हावे, कारवाई अधिक पारदर्शक व्हावी तसेच गैरवर्तनाच्या तक्रारींना आळा बसावा, यासाठी वाहतूक शाखेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्य वर्दळीच्या चौकांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येणार असून, नागरिकांशी सौम्य भाषेत वागण्यासह कर्तव्य बजावताना पालन करावयाच्या ७ मार्गदर्शक सूचना नव्याने नियुक्त सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) मनोज यादव यांनी जारी केल्या आहेत.

शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागातील अंमलदार युवराज पवार यांचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ५) हवालदार राजेंद्र खाडे यांनी एका दुचाकीस्वाराशी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाला. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस आयुक्त मनोज यादव यांनी शहराच्या उत्तर व दक्षिण विभागातील वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शिस्त, वर्तन आणि कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट सूचना दिल्या. यादव यांनी वाहनधारकांशी नेहमी नम्रतेने संवाद साधावा, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैर-आर्थिक व्यवहार करू नयेत, कारवाई पारदर्शक पद्धतीने करावी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आक्षेपार्ह भाषा व वर्तन टाळावे, असे निर्देश दिले.

तसेच गंभीर अपघात झाल्यास जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मद्यधुंद वाहनचालक, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे आणि अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वाद निर्माण झाल्यास किंवा कामात अडथळा आल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी, असेही निर्देश आहेत.

‘या’ सूचनांचे पालन बंधनकारक...

  • वाहनधारकांशी सौम्य व नम्र भाषेत संवाद साधणे.

  • बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा नियमित वापर करून कारवाई पारदर्शक ठेवणे.

  • भ्रष्टाचार व कोणत्याही प्रकारचे गैर-आर्थिक व्यवहार टाळणे.

  • सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह भाषा किंवा वर्तन न करणे.

  • गंभीर अपघातात जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविणे.

  • मद्यपी वाहनचालक, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई.

  • सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर, स्वच्छ गणवेशात हजर राहून सूचनांचे काटेकोर पालन करणे.

‘त्या’ हवालदाराचा अहवाल पोलिस आयुक्तांना दिला

वाहतूक अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडताना वाहनधारकांशी सौजन्याने वागावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शांती चौकातील वाहतूक अंमलदाराच्या वर्तनाबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

- मनोज यादव, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur civil hospital
HSRP number plate
 Nagpur Traffic Police Must Carry Service Gun During Duty
traffic police (file photo)
Marathi News Esakal
www.esakal.com