जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! सोलापूर जिल्ह्यातील 31 गावांत 'अशी' असेल कडक संचारबंदी 

तात्या लांडगे
Wednesday, 15 July 2020

आदेशातील ठळक बाबी... 

 • कोणत्याही व्यक्‍तीस कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही; घरगुती गॅस देणाऱ्यांकडे असावा गणवेश 
 • कडक संचारबंदी काळात संबंधित गावांमधील बॅंका पूर्णपणे बंद राहतील 
 • स्वस्त धान्य दुकाने, किरणा दुकाने, मटन, अंडी, चिकन विक्रीची दुकाने, हॉटेल, धार्मिक स्थळांसह अन्य आस्थापनाही बंदच राहतील 
 • शेतमाल प्रक्रिया उद्योगांना असेल परवानगी; शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांसाठी ओळखपत्र बंधनकारक 
 • बाजार समित्या, क्रिडांगणे, सार्वजनिक व खासगी वाहतूकही बंदच राहणार 
 • संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडणारे वाहन जप्त होणार; संबंधिताचा परवानाही केला जाणार रद्द 
 • विद्युत सेवा, अग्निशामक सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राद्वारे परवानगी 
 • पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरला परवानगी असेल; कृषी व कृषीविषयक सर्व उपक्रम चालू राहतील 
 • खते, किटकनाशके, औषधे, बि-बियाणे, चारा दुकाने चालू राहणार; सकाळी आठ ते दुपारी दोनची दिली वेळ 
 • आरोग्य, महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, अग्निशामक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र बंधनकारक 
 • खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा वेळेत सुरु राहतील 

सोलापूर : जिल्ह्यातील अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी व वैराग शहरासह 27 गावांमध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज घेतला. 16 ते 26 जुलै या कालावधीत या गावांमध्ये सकाळी सहा ते नऊ या वेळेत घरपोच दुध व्रिकीस परवानगी दिली आहे. हॉस्पिटल, मेडिकल सुरु राहतील. तर कृषी व इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंतच वेळ देण्यात आली आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी, तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा, भोगाव या गावांमध्ये तर दक्षिण सोलापुरातील कुंभारी, विडी घरकूल, वळसंग, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बोरामणी, होटगी, लिंबीचिंचोळी, बक्षिहिप्परगा, कासेगाव, उळेगाव, तांदुळवाडी आणि मोहोळ तालुक्‍यातील कुरुल, कामती बु. व कामती खुर्द या गावांमध्ये ही कडक संचारबंदी असणार आहे. या गावांमधील लॉकडाउन काळातील प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी प्रांताधिकारी तथा स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्‍ती करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यांना दररोजचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, आदेशात काहीसा बदल होण्याची शक्‍यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

आदेशातील ठळक बाबी... 

 • कोणत्याही व्यक्‍तीस कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही; घरगुती गॅस देणाऱ्यांकडे असावा गणवेश 
 • कडक संचारबंदी काळात संबंधित गावांमधील बॅंका पूर्णपणे बंद राहतील 
 • स्वस्त धान्य दुकाने, किरणा दुकाने, मटन, अंडी, चिकन विक्रीची दुकाने, हॉटेल, धार्मिक स्थळांसह अन्य आस्थापनाही बंदच राहतील 
 • शेतमाल प्रक्रिया उद्योगांना असेल परवानगी; शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांसाठी ओळखपत्र बंधनकारक 
 • बाजार समित्या, क्रिडांगणे, सार्वजनिक व खासगी वाहतूकही बंदच राहणार 
 • संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडणारे वाहन जप्त होणार; संबंधिताचा परवानाही केला जाणार रद्द 
 • विद्युत सेवा, अग्निशामक सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राद्वारे परवानगी 
 • पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरला परवानगी असेल; कृषी व कृषीविषयक सर्व उपक्रम चालू राहतील 
 • खते, किटकनाशके, औषधे, बि-बियाणे, चारा दुकाने चालू राहणार; सकाळी आठ ते दुपारी दोनची दिली वेळ 
 • आरोग्य, महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, अग्निशामक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र बंधनकारक 
 • खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा वेळेत सुरु राहतील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur Collector orders strict curfew in 31 villages in the district