सोलापुरात कोरोनाला चार महिने पूर्ण, बाधितांनी ओलांडला 12 हजाराचा टप्पा 

corona
corona

सोलापूर : सोलापुरात कोरोना दाखल होऊन आज बरोबर चार महिने पूर्ण झाले. चार महिन्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील बाधितांची संख्या 12 हजार 81 झाली आहे. आज नव्या 374 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 30 तर जिल्हा परिषद हद्दीतील 344 बाधितांचा समावेश आहे. जिल्हा परिषद हद्दीतील दहा व महापालिका हद्दीतील एक अशा एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिका हद्दीतील 14 व जिल्हा परिषद हद्दीतील 128 असे एकूण 142 जण आज कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील 59 तर जिल्हा परिषद हद्दीतील 136 असे एकूण 195 कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 573 झाली आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना आटोक्‍यात आल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येऊ लागले आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ही संख्या आटोक्‍यात आणण्याचे मुख्य आव्हान सध्या जिल्हा प्रशासना समोर आहे. महापालिका हद्दीतील 4 हजार 233 व जिल्हा परिषद हद्दीतील 3 हजार 689 अशा एकूण 7 हजार 922 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात 344 तर एकट्या पंढरपुरात 136 नवे बाधित 
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 344 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये एकट्या पंढरपूर तालुक्‍यातील 136, बार्शी तालुक्‍यातील 65, सांगोल्यातील 31 तर माळशिरस तालुक्‍यातील 23 रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आज स्पष्ट झाले असून त्यामध्ये एकट्या बार्शी तालुक्‍यातील पाच जणांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्‍यातील दोन, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व सांगोल्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. ग्रामीण मधील बाधितांची एकूण संख्या आता 6 हजार 531 वर पोहोचली असून आतापर्यंत 189 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 136 अहवाल प्रलंबित आहेत. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये अक्कलकोटमधील ए-वन चौक, हत्तीकणबस कर्जाळ, कुरनूर, करमाळ्यातील अर्जुन नगर, भगतवाडी, दहीगाव, पिंपळवाडी, साठे नगर, सिद्धार्थ नगर, वीट येथील रुग्णांचा समावेश आहे. माढ्यातील फडतरे वस्ती, कुर्डू, म्हैसगाव, मानेगाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, कन्हेर, माळीनगर, मांडवे, पठाणवस्ती, संगम, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपुर, वेळापूर येथील बाधितांचा समावेश आहे. 

मंगळवेढ्यातील आदर्शनगर, आंधळगाव, आरळी, माने गल्ली, मुरडे गल्ली, शिरनांदगी येथील रुग्णांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव, भोसे, डाळे गल्ली, एकलासपूर, गांधी रोड, गणेश नगर, इसबावी, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भाळवणी, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लोणारवाडी, महावीर नगर, माळीवस्ती, नामदेव मंदिराजवळ, आयटीआय कॉलेज जवळ, ओझेवाडी, परदेशी नगर, रोपळे, रुक्‍मिणी नगर, सांगोला रोड, संत पेठ, शिरगाव, स्टेशन रोड, सुस्ते, तुळशीनगर, उजनी कॉलनी, वाखरी, वाल्मिकी नगर, विजापूर गल्ली येथील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

बार्शीतील आदर्शनगर, बारबोले प्लॉट, बारंगुळे प्लॉट, भीम नगर, भिसे प्लॉट, ब्राह्मण गल्ली, बुरुड गल्ली, दडशिंगे, दत्तनगर, देशमुख प्लॉट, ढगे मळा, एकविरा आई मंदिराजवळ, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, जैन गल्ली, जामगाव, कपासे बोळ, खामगाव, खुरपे बोळ, किराणा रोड, कोरफळे, कोष्टी गल्ली, कुर्डूवाडी रोड, लहुजी नगर, मंगळवार पेठ, नाईकवाडी प्लॉट, नवी चाटे गल्ली, पांगरी, परांडा रोड, पाटील प्लॉट, रामभाऊ पवार चौक, रोडगा रस्ता, सौंदरे, सिद्धार्थनगर, सुलाखे हायस्कूल रोड, तुळजापूर रोड, उंबरगे, उपळाई रोड, वाणी प्लॉट व झाडबुके मैदान येथील बाधितांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील अकोले मंद्रूप, औज मंद्रूप, बरुर, हत्तुर, होटगी स्टेशन, कुंभारी, मुस्ती, वळसंग तांडा, वळसंग येथील रुग्णांचा समावेश आहे. सांगोला तालुक्‍यातील बामणी, चिकमहूद, एकतपुर, गौडवाडी, जवळा, खवसापूर, कोष्टी गल्ली, महूद, नाझरे, विद्यानगर येथील रुग्णांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी, गावडी दारफळ, कोंडी, वडाळा, मोहोळ तालुक्‍यातील कुरुल व यावली या गावात आज कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com