esakal | सोलापूर जिल्ह्याने 13 दिवसात ढोसली चार लाख 29 हजार लिटर दारू 
sakal

बोलून बातमी शोधा

wine

सोलापुरातील मद्य विक्री सुरू करताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या नियमावलीनुसार घरपोच मद्य विक्री केली जात आहे. बिगर प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानानांच घरपोच मद्य विक्रीची परवानगी देण्यात आलेली आहे. 
- रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर 

सोलापूर जिल्ह्याने 13 दिवसात ढोसली चार लाख 29 हजार लिटर दारू 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या होत्या. त्यामध्ये मद्य विक्री बंद ठेवण्यात आली होती. कधी नव्हे ते तब्बल अडीच महिने मद्य विक्री बंद होती. 14 जूनपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील बिगर प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच मद्य विक्रीला सुरुवात झाली आहे. 14 जून ते 26 जून या अवघ्या 13 दिवसांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील तळिरामांनी तब्बल 4 लाख 29 हजार 262 लिटर दारू ढोसली आहे. 

या तेरा दिवसांमध्ये सरासरी दिवसाला 33 हजार लिटर दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. घरपोच मद्य विक्रीच्या माध्यमातून तळीरामांना मद्य पुरवठा केला जात आहे. तब्बल अडीच महिन्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी केले आहे. मद्य विक्री सुरू झाली असली तरीही सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येत्या काळात लॉकडाऊन झाल्यास पुन्हा मद्याचा तुटवडा नको म्हणून अनेक मद्य ग्राहक जास्तीचे मद्य खरेदी करू लागले आहेत. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात दिवसाला सरासरी 14 हजार ते 15 हजार लिटरच्या दरम्यान देशी दारूची विक्री होत आहे. विदेशी मद्य विक्रीची दिवसाची सरासरी विक्री देखील 14 ते 15 हजार लिटरच्या दरम्यान आहे. बिअरची दिवसाची विक्री सरासरी पाच ते सहा हजार लिटरच्या दरम्यान आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ब्लॅकने व चढ्या दराने तळीरामांना मद्य खरेदी करावे लागले होते. 

14 ते 26 जून कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेली मद्य विक्री 
देशी : एक लाख 70 हजार 426 लिटर 
विदेशी मद्य : 1 लाख 87 हजार 847 लिटर 
बिअर : 70 हजार 989 लिटर 
एकूण : 4 लाख 29 हजार 262 लिटर