Mohal: अंगावरील सोन्याच्या लोभाने गड्यानेच केला मालकाचा खून, मृतदेहाचे केले तुकडे

Solapur Latest News: मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला.
1. Solapur Mohol Murder: Worker Kills Owner, Cuts Body into Pieces in Greed of Gold
1. Solapur Mohol Murder: Worker Kills Owner, Cuts Body into Pieces in Greed of Gold sakal
Updated on

अंगावरील सोने चोरी साठी शेतातील गड्यानेच मालकाचा खून करून, त्यांच्या मृत देहाचे तुकड़े करून ते पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकास अटक केली आहे. कृष्णा नारायण चामे वय 52 रा काळेवाडी पुणे हल्ली मुक्काम यल्लमवाडी ता मोहोळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, यातील संशयित सचिन भागवत गिरी वय 25 रा सांघवी जिल्हा धाराशिव सध्या रा चामेवस्ती यल्लमवाडी हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करीत होता. मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला.

1. Solapur Mohol Murder: Worker Kills Owner, Cuts Body into Pieces in Greed of Gold
सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com