शुक्रवारपासून धावणार सोलापूर-मुंबई-सोलापूर सुपरफास्ट एक्‍स्प्रेस ! "या' स्थानकांवर असणार थांबे 

तात्या लांडगे 
Wednesday, 7 October 2020

कोरोना या साथीच्या आजारामुळे महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. आता टप्प्या-टप्प्याने विशेष प्रवासी एक्‍स्प्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर-मुंबई- सोलापूर ही विशेष सुपरफास्ट एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारपासून (ता. 9) धावणार आहे. 

सोलापूर : कोरोना या साथीच्या आजारामुळे महाराष्ट्रासह देशभरातील रेल्वेची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. आता टप्प्या-टप्प्याने विशेष प्रवासी एक्‍स्प्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर-मुंबई- सोलापूर ही विशेष सुपरफास्ट एक्‍स्प्रेस रेल्वे शुक्रवारपासून (ता. 9) धावणार आहे. 

सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसच्या वेळेत ही गाडी धावेल. स्थानकावरील थांबेसुद्धा त्याचप्रमाणे असतील. परंतु कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही. 

गाडी क्रमांक 02115 छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) ते सोलापूर सुपरफास्ट विषेश एक्‍स्प्रेस शुक्रवारपासून (ता. 9) सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे. गाडी क्रमांक 02116 सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) सुपरफास्ट विशेष एक्‍स्प्रेस शुक्रवार (ता. 9) पासून सोलापूर स्थानकावरून धावणार आहे. 

अशी आहे नवी नियमावली... 

 • ट्रेनमध्ये कोणताही अनारक्षित कोच राहणार नाही 
 • सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. 
 • भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल. 
 • केवळ पुष्टीकृत (confirmed) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल. 
 • सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास परवानगी आहे. 
 • ट्रेनमध्ये बेडशीट आणि ब्लॅंकेट्‌स दिले जाणार नाहीत आणि पडद्यांची सुविधा गाड्यांमध्ये दिली जाणार नाही 
 • अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतीक्षा यादीतील तिकीटधारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. 
 • प्रवासात कोणतीही अनारक्षित (यूटीएस) तिकीट दिले जाणार नाही आणि कोणत्याही प्रवाशाला तिकीटही दिले जाणार नाही 
 • सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहरा मास्क घातलेले असले पाहिजेत 
 • प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवले पाहिजे 
 • कोव्हिड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. 
 • कोव्हिड-19 शी निगडित इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्‍चित केल्या जातील 
 • महाराष्ट्र सरकारची नियमावली पाळली जाईल 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Solapur-Mumbai-Solapur Superfast Express will run from Friday