सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय! शहरातील बससेवेला सोमवारपासून प्रारंभ पण... 

तात्या लांडगे
Sunday, 9 August 2020

हे नियम पाळणे बंधनकारक 

  • आसन क्षमतेच्या 50 टक्‍केच बसतील प्रवासी 
  • प्रवासी, चालक व वाहकांना मास्कचा वापर बंधनकारक 
  • एका आसनावर एकच प्रवासी बसण्यास परवानगी 
  • दररोज होणार प्रत्येक बसचे निर्जुंतुकीकरण  

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी नियमांचे बंधन घालून शहरातील 15 मार्गांवरील बससेवा उद्या (सोमवार) सुरु करण्याचा निर्णय महापालिकेचे सहायक आयुक्‍त श्रीराम पवार यांनी घेतला. राज्यातील काही बहुतांश शहरांमध्ये कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने अद्याप स्थानिक बससेवा सुरु झालेली नाही. परंतु, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्ववत झाल्याने सोलापूर महापालिकेने बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

शेटी वस्ती ते जुना विडी घरकूल, कौतम चौक ते प्रल्हाद नगर, कौतम चौक ते साखर कारखाना, रेल्वे स्टेशन ते गोदुताई घरकूल (पाणी टाकी), कौतम चौक ते राजस्व नगर (व्हाया निर्मिती विहार व सुंदरम नगरमार्गे), रेल्वे स्टेशन ते निलम नगर, विनायक नगर, कन्ना चौक ते जुना विडी घरकूल या मार्गांची निवड करण्यात आली आहे. तसेच कौतम चौक ते नई जिंदगी (व्हाया कुमठा नाका), कौतम चौक ते ज्ञानेश्‍वर नगर, रेल्वे स्टेशन ते देसाई नगर, रेल्वे स्टेशन ते शेळगी (मित्र नगर), कन्ना चौक ते गोदुताई घरकूल, कन्ना चौक ते निलम नगर, विनायक नगर, कौतम चौक ते देगाव (व्हाया स्टेशन वानकर वस्ती) या मार्गांवरुनही बस धावणार आहेत. दररोज या मार्गावरुन पाच ते दहा फेऱ्या होणार असल्याचेही श्री. पवार यांनी आदेशात नमूद केले आहे. 

हे नियम पाळणे बंधनकारक 

  • आसन क्षमतेच्या 50 टक्‍केच बसतील प्रवासी 
  • प्रवासी, चालक व वाहकांना मास्कचा वापर बंधनकारक 
  • एका आसनावर एकच प्रवासी बसण्यास परवानगी 
  • दररोज होणार प्रत्येक बसचे निर्जुंतुकीकरण  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Municipal Corporation's big decision to start bus service in the city from Monday